आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांना पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भोकर मतदारसंघात ‘बदला’ घेऊ, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. तालुकाध्यक्ष भगवान दंडवे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, रमेश राठोड यांनी दिलेल्या संयुक्त पत्रात काँग्रेसविरुद्ध दंड थोपटल्याची भाषा वापरली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० डिसेंबरला शाहूमहाराज विद्यालयाच्या प्रांगणावर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील असणार आहेत. माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटूरकर, कमलकिशोर कदम, बापुसाहेब देशमुख गोरठेकर, डी. बी. पाटील, प्रताप पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोकर मतदारसंघात बदला घेऊ, असे आवर्जून नमूद केले. लोकसभा निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकर यांना निवडून आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांना बापुसाहेब देशमुख यांच्यासाठी प्रचार केला नाही. भोकर मतदारसंघात प्रशासकीय समित्यांवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले नाही. भोकर विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीने उमेदवार तयार ठेवले असून राज्यात स्वतंत्र निवडणुका घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा