वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ( दि. १७) ११ वाजता किसन वीर कारखान्यावर मोटारसायकल रॅली मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाची सुरूवात पाचवड येथील बाजार समितीच्या बाजारतळापासून होणार आहे.
ही रॅली पाचवड – वाई – शेंदुरजणे – सुरूर – कवठेमार्गे कारखाना कार्यस्थळावर जाणार आहे. या वेळी सभासद शेतकऱ्यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनास देण्यात येणार आहे.
मागील गळीत हंगामात किसन वीर कारखान्याने २२५० रू. जाहीर केले, परंतु २१०० रु पयेच शेतकऱ्यांना दिले. कारखान्याने जाहीर केलेला २२५० रु पये दरही शेतकऱ्यांना अमान्य असून उसाच्या रिकव्हरीनुसार सहयाद्री कारखान्याइतकाच म्हणजे २५५० रुपये दर मिळावा, चालू गळीत हंगामातील उसाला ३००० रु पयांची पहिली उचल मिळावी, कारखान्याने शेतकऱ्यांच्या कपात करून घेतलेल्या ठेवींवर गेल्या दहा वर्षांत एक रु पयाही व्याज दिले नाही.
सदर ठेवी व व्याजाची रक्कम अशी एकूण ४७ कोटी रु पये शेतकऱ्यांचे कारखान्याकडे जमा आहेत. या ठेवी व्याजासहित ताबडतोब परत मिळाव्यात, आज साखर व कारखान्यातील उपपदार्थाचे विक्रीचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे कारखान्याला कोटयवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या मागण्यांसाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव पवार, माजी सभापती प्रमोद िशदे, दिलीप पिसाळ, विजय नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अॅड. उदयसिंह पिसाळ, माजी उपसभापती महादेव मसकर, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, संजय लोळे, नगरसेवक डॉ. अमर जमदाडे, जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव जमदाडे,
बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, उपसभापती रवींद्र जाधव यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा