विरोधकांना धनाजी-संताजीसारखा मीच पाण्यात दिसतो. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुसऱ्यांवर टीका करण्याचे उद्योग आता बंद करावेत, असे आवाहन आमदार विजय औटी यांनी रविवारी दरोडी येथे केले. दरम्यान, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे तीन तुकडे करण्याचे पाप कोणाचे होते, याचा आपण लवकरच भांडाफोड करणार असून तसे पुरावे आपल्याकडे आहेत. पारनेर मतदारसंघाचे पुनरुज्जीवन आपणच केल्याचा दावाही औटी यांनी केला.
दरोडी येथील विविध कामांचे उद्घाटन औटी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते. सभापती सुदाम पवार, उद्योजक गंगाराम बेलकर, प्रभाकर कवाद, मंदाताई भोसले, अशोक कटारिया, गणेश शेळके, गटविकास अधिकारी किरण महाजन आदी या वेळी उपस्थित होते.
आपली संघटना सांभाळायची सोडून विरोधक केवळ आपल्यावर टीका करीत सुटले आहेत. त्यांच्या मेळाव्यात एकही वक्ता ही संधी सोडत नाही. याचा अर्थ मी काम केले आहे हेच सिद्घ होते, असे सांगून औटी म्हणाले, निवडणुकांमध्ये पैसा ओतण्यापेक्षा लोकांच्या विश्वासास पात्र राहून काम केले पाहिजे. वाळूतस्कर त्यांचे कार्यकर्ते प्रतिष्ठित म्हणून मिरवतात, गळय़ात, हातात सोन्याचा गोफ पाहिला की समजावे, हा त्यांचाच कार्यकर्ता. असे कार्यकर्ते असतील तर अधिकारी तुमचे कसे ऐकतील असा सवाल औटी यांनी केला.
राष्ट्रवादीने टीकेचे उद्योग बंद करावे- आ. औटी
विरोधकांना धनाजी-संताजीसारखा मीच पाण्यात दिसतो. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुसऱ्यांवर टीका करण्याचे उद्योग आता बंद करावेत, असे आवाहन आमदार विजय औटी यांनी रविवारी दरोडी येथे केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-10-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp should be close criticism mla auti