भारतीय सैन्यदलात सामील होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी यांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी येथील सुदर्शन अकॅडमीच्या वतीने मोफत सुविधा करण्यात आली आहे.
१४ एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा मुंबई व नागपूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने ६६६.४स्र्२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर २१ जानेवारी पर्यंत भरावयाचे आहेत. परीक्षेसाठी दोन जानेवारी १९९५ ते एक जुलै १९९७ या कालावधीत जन्म झालेली व्यक्ती पात्र राहिल. उमेदवार १२ वीत शिकत असलेले तसेच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तरी पात्र आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क माफ असून इतर सर्व उमेदवारांसाठी १०० रूपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोख किंवा क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याव्दारे भरावे लागतील. परीक्षे संदर्भात अर्ज भरण्याच्या मोफत मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी सुदर्शन अकॅडमी, गजानन प्लाझा, घारपुरे घाट रोड, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, अशोक स्तंभ, नाशिक किंवा ७३५००१२३४९, ९८६०७६५७१० या क्रमांकावर संपर्क साधावा.