जातीयवादी, धार्मिक इतिहासलेखन बाजूला सारून वस्तूनिष्ठ इतिहासलेखन होणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोग व पारनेर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इतिहास व मराठी विषयांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य नंदकुमार निकम, शिवाजीराव देवढे, डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य सुधाकर शिंदे व यू. आर. ठुबे, इतिहास विभागप्रमुख प्रा. मदन काशिद, मराठी विभागप्रमुख प्रा. साखर दिवटे आदी यावेळी उपस्थित होते.
सध्याचे इतिहासलेखन वस्तूनिष्ठ नसल्याचे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, तळागाळातील लोकांचा, मजूर, स्त्रियांचा व उपेक्षितांचा इतिहास लिहिणे गरजेचे आह़े
कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी धर्मनिरपेक्ष समतोल, व्यापक व विश्वात्मक असे लेखन उपयुक्त असते. समाज परिवर्तनासाठी परिवर्तनवादी साहित्याची मांडणी होणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या इतिहासातील कोत्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला.
साहित्य व इतिहास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगून नंदकुमार निकम म्हणाले, ऐतिहासिक घटनांचा बोध घेउन काळानुसार मानवी संस्कृतीच्या भूमिका वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात.
सिनेमा, तसेच विविध वाहिन्यांवरील ऐतिहासिक मालिकांतील अतिरेक इतिहासापुढील धोका असल्याचे सांगतानाच दरबारी ऐतिहासिक लेखनाचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे आग्रही मत निकम यांनी मांडले.
प्राचार्य डॉ.आहेर यांनी स्वागत करून कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश विषद केला. प्रा. वैशाली भालसिंग यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हरेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा