स्त्रीमुळे विश्वाची निर्मिती झाली. स्त्री ही नवनिर्मितीची प्रेरणा असते, मात्र समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्याला पायबंध घालण्यासाठी संरक्षण व हक्कांसाठी महिलांनी लढा उभारणीची गरज असल्याचे डॉ. जयश्री श्रेणीक-पाटील यांनी सांगितले.
कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महिलादिनानिमित्त महिला सभासद मेळावा पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कृषिभूषण नूतन जगन्नाथ मोहिते या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले.
डॉ. पाटील म्हणाल्या, धावपळीच्या युगात आपण आपले आरोग्य हरवत चाललो आहोत. तरी स्त्रियांनी आपल्या आरोग्याविषयी काही बंधने पाळणे गरजेचे आहे. स्वत:चे घर सांभाळून इतर जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे. पुरुषांच्या बरोबरीने चालताना स्त्रियांनी मनातील भीती दूर ठेवायला हवी. आज महिला वेगवेळय़ा क्षेत्रांत काम करत आहेत. मुलगी वंशाची पणती आहे हे समजून घ्यायला हवे. स्वत:च्या रक्षणासाठी महिला संघटित झाल्या तरच त्या समाजात सुरक्षित राहतील.
उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पध्रेतील विजेत्या महिलांना या वेळी बक्षिसे देण्यात आली. या वेळी अध्यक्ष अविनाश मोहिते, संचालिका विजया पाटील, राजाक्का चव्हाण, अर्चना मोहिते, अश्विनी मोहिते, जिल्हा परिषदेच्या सदस्य अनुराधा लोकरे, पंचायत समितीच्या सदस्या रूपाली यादव, वाळवा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुश्मिता जाधव, आशा पाटील, नंदाताई जगताप, सर्व संचालक उपस्थित होते. नीलम जगताप यांनी स्वागत केले. प्रास्ताविक नम्रता खोत यांनी केले. अश्विनी जगताप, डॉ. उल्का पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजया सुर्वे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा