गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर ३२ वर्षांनंतरही जिल्हा निर्मितीमागील   उद्देश    पूर्णपणे   सफल    झाला   नाही. शासनाने विविध योजना युद्धस्तरावर राबवण्याचा प्रयत्न केला पण काही   समस्या    अजूनही  कायम   आहेत.   स्वतंत्र जिल्हा विकास प्राधिकरणासोबत जिल्हय़ातील तरुणांना रोजगाराच्या   संधी    उपलब्ध  करून    देण्याचे   दृष्टीने शासनाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आह, असे उद्गार विधान परिषदेचे   सभापती  शिवाजीराव देशमुख यांनी काढले.
 रवींद्र दरेकर व मित्रपरिवारातर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजीराव देशमुख यांचा शाल,   श्रीफळ   व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार मुजफर हुसैन, आमदार विरेंद्र जगताप, आमदार आनंदराव गेडाम, सुभाष धोटे, डॉ. नामदेव उसेंडी, दीपक आत्राम, राजश्री जिचकार, जयप्रकाश गुप्ता, जीया पटेल, हसन गिलानी, मधुकर लिचडे, डॉ. विनायक इरपाते, डॉ. कोकोडे, प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. गोविंद भेडारकर, सतीश विधाते, विलास ढोरे उपस्थित होते.

Story img Loader