महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि मोबाईलप्रेमी मंडळींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी जिव्हाळ्याचे माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्स अॅप’वर अन्य देशांबरोबरच भारताचा राष्ट्रध्वज का नाही, असा प्रश्न सध्या ‘फेसबुक’वर चर्चिला जात आहे. ‘व्हॉट्स अॅपवर हवा भारताचा तिरंगा’ अशी एक प्रचार मोहीमच सध्या ‘फेसबुक’वर चालविली जात आहे.
‘व्हॉट्स अॅप’वरून एखादा संदेश पाठविताना त्याच्यासोबत देशाचा ध्वज असलेले स्टिकर पाठविण्याची सोय आहे. सध्या या स्टिकर्समध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन, जपान, कोरिया, स्पेन आदी देशांचे राष्ट्रध्वज देण्यात आले आहेत. ‘व्हॉट्स अॅप’चा वापर करणाऱ्यांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांची संख्या खूप अधिक आहे. तरीही भारताचा ध्वज का देण्यात आला नाही, असा सवाल ‘फेसबुक’वर विविध समूहांकडून विचारला जात आहे. १५ ऑगस्टपूर्वी ‘व्हॉट्स अॅप’वर भारताचा तिंरगा यावा आणि त्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’च्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.‘फेसबुक’वर या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक जण ‘फेसबुक’वर याला ‘लाईक’ करत आहेत. ही चळवळ अधिक प्रभावीपणे चालविण्यासाठी ‘फेसबुक’वर काही समूह तयार झाले आहेत. या चळवळीच्या माध्यमातून ‘व्हॉट्स अॅप’च्या प्रशासनावर दबाव आणून भारताचा तिरंगा ‘व्हॉट्स अॅप’वर झळकतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
‘व्हॉट्स अॅप’वर भारताचा तिरंगा हवा!
महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि मोबाईलप्रेमी मंडळींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी जिव्हाळ्याचे माध्यम ठरलेल्या..
First published on: 01-08-2013 at 06:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need tricolour on whatsapp propaganda campaigning on facebook