निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल ३१ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी सेवेतून निलंबित केले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
जालना विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे काम जालना नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन व भूमी अभिलेख कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या कामाचा जिल्हाधिकारी देशपांडे यांनी डॉ. आंबेडकर सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहात सर्व संबंधित विभागांतील कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला, त्या वेळी ही बाब समोर आली. कार्यालयातील ३१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी बजावले आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, जालना मतदारसंघातील सर्व बीएलओंची बैठक बोलविली होती. बैठकीची पूर्वसूचना सर्वाना दिली होती. मात्र, तरीही हे कर्मचारी गैरहजर राहिले. त्यामुळे मतदारासंघाचे फोटो जमा करून मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम करता आले नाही. या राष्ट्रीय कार्यात निष्काळजीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशपांडे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा