भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शहरात विविध संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. स्नेहल पाडळे, स्वातंत्रसैनिक वसंत जोशी, मधुकर राऊत, द.स.पोळेकर, चंद्रशेखर घाटे, कृष्णकांत जाधव आदी उपस्थित होते.
पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे नेहरू स्टेडियम येथील नेहरूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नीता जगताप, लतिफा शेख, जयश्री पारख, धनश्री कदम आदी या वेळी उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एकलव्य संस्थेतील लहान मुलांना खेळणी व खाऊ वाटप करून पंडित नेहरूंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, उल्हास पवार, अभय छाजेड, संस्कृती बालगुडे आदी उपस्थित होते. तसेच शाहिन फ्रेंड सर्कलच्या वतीने ताडीवाला रस्ता येथील शाहिन बालउद्यानात लहान मुलांच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नेहरूजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजू कांबळे, दस्तगीर नदाफ, यासीन शेख आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा