नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध प्राथमिक शाळांतील ४० शिक्षकांची पवई येथील आयआयटीमध्ये होणाऱ्या दोन
दिवसीय प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती संस्था अध्यक्ष
 प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी दिली.
संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम समितीच्या माध्यमातून प्रशिक्षणाची कार्यवाही सुरू असून गेल्या सत्रात माध्यमिक स्तरावरील ४० गणित-विज्ञान विषय शिक्षकांनीही सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
संस्थेचे देणगीदार हेमेंद्रभाई कोठारी यांच्या हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शिक्षकांच्या
दैनंदिन अध्ययन व अध्यापनात प्रशिक्षणातंर्गत मिळालेल्या ज्ञानाचा निश्चित फायदा होत असल्याचे समन्वयक कल्पना पवार व शिवाजी सोनवणे
यांनी सांगितले. या प्रशिक्षणासाठी प्रा. रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली
प्रथमच प्राथमिक व माध्यमिक दोन्ही स्तरावरील ८० शिक्षकांची
निवड झाल्याचे उपाध्यक्ष रमेश देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader