रस्ता रुंदीकरण मोहिमेनंतर औरंगाबादकरांसाठी ‘सिंघम’ ठरलेल्या महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गुरुवारी नवे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे पदभार सोपविला. डॉ. कांबळे औरंगाबादला रुजू होण्यास इच्छुक नव्हते, अशी चर्चा होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
औरंगाबाद महापालिकेत अनेक धाडसी निर्णय घेणारा अधिकारी, अशी डॉ. भापकर यांची ओळख निर्माण झाली. शहरातील २४ रस्त्यांचे रुंदीकरण त्यांनी हाती घेतले. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही त्यांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे मोठे कौतुक झाले. ज्या भागात हातोडा चालविणे शक्य नाही, असे सर्वसामान्य औरंगाबादकरांना वाटे तेथे डॉ. भापकर यांनी रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत पुढाकार घेतला. त्यांनी भाऊ-दीदी प्रकल्पही सुरू केला.
औरंगाबादच्या विकासात हातभार लावल्याने शिवसेना-भाजपचे नेते त्यांच्या कामावर खूश होते. एका रस्त्याला त्यांचे नावही देण्यात आले. त्यांनी साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ आयुक्तपदाची धुरा सांभाळली. वारंवार प्रयत्न करूनही महापालिकेला आर्थिक शिस्त मात्र त्यांना लावता आली नाही. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून महापालिकेला आर्थिक शिस्त लागावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा