केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू योजनेसाठी तयार करण्यात आलेला पुणे शहराचा सन २०४१ पर्यंतचा विकास आराखडा नागरिकांना माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखडय़ावर नागरिकांकडून सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध प्रकल्पांसाठी पुणे शहराला नेहरू योजनेतून अनुदान मिळते. या योजनेचा दुसरा टप्पा येत्या आर्थिक वर्षांपासून सुरू होत असून त्यासाठी काही प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठीचा शहर विकास आराखडा महापालिकेने तयार करून घेतला आहे. हा आराखडा पुणेकॉर्पोरेशनडॉटओरजी या महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून आराखडय़ाच्या छापील प्रती व सीडीदेखील आता उपलब्ध झाली आहे.
शहर विकास आराखडय़ाच्या छापील प्रती महापालिका मुख्य भवनातील तिसऱ्या मजल्यावरील माहिती अधिकार ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच आराखडय़ाची सीडी महापालिका मुख्य भवनातील जनता संपर्क अधिकारी यांच्या कार्यालयात (तळ मजला) उपलब्ध असल्याचे जनता संपर्क अधिकारी संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा