मॅजेस्टिक बुक डेपोच्या दिवाळी अंक सवलत योजनेत दीपावली, मौज, कालनिर्णय, महाराष्ट्र टाइम्स, अनुभव, अक्षर, वयम् हे सात दिवाळी अंक तसेच भारत सासणे (त्वचा), डॉ. आनंद नाडकर्णी (कर्मधर्मसंयोग-मर्म सात्त्विक जीवनाचे), राजेंद्र यादव (चालत दुरोनी आलो मार्गे), द्वारकानाथ संझगिरी (तानापिहीनिपाजा)या चार पुस्तकांपैकी एक पुस्तक नोंदणी करताना मिळणार आहे. ‘मॅजेस्टिक कालनियोजक’ ही ६० रुपये किमतीची डायरी असा ९७० रुपयांचा संच ७२० रुपयात मिळणार आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी  गिरगाव (०२२-२३८८२२४४), मॅजेस्टिक ग्रंथदालन (०२२-९८९२२२९२३९) येथे संपर्क साधावा.
‘आयडियल’ दिवाळी अंक योजना
आयडियल-लाजरी दिवाळी अंक भेट योजनेत चारचौघी, माहेर, मिळून साऱ्याजणी, मैत्रीण हे ५४० रुपये किंमतीचे अंक ५०० रुपयात तसेच ‘स्मृतिचित्रे’ आणि ‘मी वनवासी’ ही ५०० रुपये किंमतीची पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. तर आयडियल-बालमैफल योजनेत किशोर, छावा, गंमतजंमत, टॉनिक, बालमैफल हे दिवाळी अंक तसेच श्यामची आई, सफर ऐतिहासिक किल्ल्यांची, प्रयोगातून विज्ञान ही पुस्तके मोफत दिले जाणार आहे. या संचाची किंमत ३५० रुपये आहे. आयडीयल दिवाळी अंक भेट योजनेत आवाज, मौज, किस्त्रीम, कथाश्री, महाराष्ट्र टाइम्स हे ६१० रुपयांचे अंक ५०० रुपयात मिळणार आहेत.
त्यांच्यासोबत भारतीय संस्कृती हे पुस्तक आणि शतायुषी दिवाळी अंक मोफत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत तेंडुलकर यांच्याशी ७७३८२९७००७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader