देश-विदेशातील विविध वस्त्रप्रावरणे आणि देशातील नावीन्यपूर्ण संस्कृतीची झलक ‘झेनित २ के १३’ या कार्यक्रमात पाहावयास मिळाली. इचलकरंजी येथील डीकेटीई इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित फॅशन शो स्पर्धेतील या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कल्पकतेने तयार केलेली वस्त्रप्रावरणे आणि त्याचे सादरीकरण प्रभावी ठरले. या स्पर्धेत वर्मा ग्रुप विजेता तर एक्स्ट्रा वॅगन झा ग्रुप उपविजेता ठरला.
ट्रॅडिशनल, कॅज्युअल आणि फॉर्मल असा तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा झाल्या. ट्रॅडिशनल फेरीमध्ये भारतीय नृत्य, मेक्सिकन व इजिप्तिशियन संस्कृती, महाभारत असे प्रसंग सादर करण्यात आले. कॅज्युअल फेरीत वेगवेगळे खेळ, बुद्धिबळचा खेळ, वस्त्रांची होत गेलेली उत्क्रांती यावर वेशभूषा सादर करण्यात आली.
नेत्रदीपक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी वस्त्रांचा मिलाफ आणि कल्पकतेने केलेले वस्त्रांची रचना यामुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. अनेक वस्त्रप्रावरणांची रचना विद्यार्थ्यांनीच केली होती. या स्पर्धेत मिस डीकेटीईचा मान पूजा वर्तक हिने, तर मिस्टर डीकेटीईचा मान रोहित देिशगे यांनी मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे, परीक्षक प्रज्ञा कापडिया, दीपिका मर्दा, आदर्श चव्हाण यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संस्थेच्या मानद सचिव सपना आवाडे, संचालक राजू कुडचे, अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे नियोजन प्रा. एल. जी. पाटील, प्रा. उके, प्रा. यू. पी. म्हसवेकर यांनी केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा