वातानुकूलित लोकल, स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग आणि स्थानकांच्या विस्ताराचे वर्ष नवीन वर्ष नवीन आशा, अपेक्षा घेऊन येते. २०१५ हे वर्षही अनेक नव्या गोष्टी आपल्या उदरात घेऊन येत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वैतागलेल्या मुंबईकरांसाठी या वर्षी २१४० कोटी रुपयांचे नवे काँक्रीट आणि डांबरी रस्ते तयार होत आहेत. तर लोकलच्या जीवघेण्या गर्दीत घामाघूम होणाऱ्या प्रवाशांसाठी या वर्षी वातानुकूलित लोकल गाडीच्या रूपाने नवा दिलासा मिळणार आहे. मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगेमहाराज चौकापर्यंतचा पुढचा टप्पा २०१५ अखेपर्यंत सुरू होण्याची आशा आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातही या वर्षी समकालीन विषयांपासून ‘बाजीराव मस्तानी’सारख्या ऐतिहासिक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader