संगणक तसेच मोबाइलवरही भारतीय भाषांचे अनेक फॉण्ट उपलब्ध आहेत. पण प्रत्यक फॉण्टमध्ये काही ना काही त्रुटी आहेच. यामुळे नवनवीन फॉण्टची निर्मिती होत असते. आयआयटीमधील इंडस्ट्रीअल डिझाइन सेंटर(आयडीसी)मध्ये फॉण्टवर काम करणाऱ्यांनी ‘एक मुक्त’ नावाच्या फॉण्टची निर्मिती केली आहे. हा फॉण्ट सध्या बाजारात असलेल्या फॉण्टच्या तुलनेत खूपच वेगळा आहे.
आयडीसीमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘एक टाइप’ या प्रकल्पाची सुरुवात झाली. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही फॉण्टमधील दिसणं खूप वेगळे असते. हे दिसणे एकच करण्याचे काम या टीमने केले आहे. या टीममध्ये प्रा. गिरीश दळवी, नुपुर दाते आणि सारंग कुलकर्णी यांचा समावेश आहे. या त्रयीने लिप्यांची परंपरा आणि त्यांचे व्याकरण लक्षात घेऊन फॉण्टची निर्मिती केली आहे. भारतीय फॉण्टला सध्या कोणतीही प्रमाणबद्धता नाही. ही प्रमाणबद्धता आणण्यासाठी या टीमने विशेष मेहनत घेतली आहे.
या फॉण्टची आणखी एक खासियत म्हणज तो वेब आधारितही आहे आणि छापण्यासही उपयुक्त आहे. हा मराठी फॉण्ट हा युनिकोड आधारित असून यामध्ये दैनंदिन वापरातील अनेक चिन्हे देण्यात आली आहेत. या चिन्हांचा समावेश बहुतांश मराठी फॉण्टमध्ये दिसून येत नाही. याच टंकसमूहात कंपनीने गुजराती आणि अन्य भाषांमध्येही फॉण्ट तयार केले आहेत. अनेक मराठी फॉण्ट हे टाइप केल्यावर एक तर खूप लहान दिसतात किंवा खूप मोठे दिसतात. पण हा फॉण्ट इंग्रजी फॉण्टच्या नुसारच दिसत असल्यामुळे लहान असला तरी तो वाचनीय होतो.
देवनागरी आणि लॅटिन फॉण्ट हे मुक्तस्रोतात तयार करण्यात आले आहे. हा असा एकमेव फॉण्ट आहे की ज्यामध्ये अपूर्णाक देण्यात आला आहे, असे कंपनीचे प्रधान रचनाकार सारंग कुलकर्णी सांगतात.
येणाऱ्या पिढीला टंकरचनेचा पाया सहज उपलब्ध व्हावा, टंकरचनाकार तांत्रिक गोंधळात अडकू नये यासाठी हे फॉण्ट मुक्तस्रोतात तयार करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. भारतीय लिपीतील टंकरचना हे अवघड काम आहे हा गरसमजही यातून दूर केला जाऊ शकतो आणि अधिकाधिक टंकरचनाकार तयार होऊ शकतील, असेही ते म्हणाले. देवनागरी आणि लॅटिन फॉण्ट मुक्तस्रोतात बनविले गेल्यामुळे ते मोफत उपलब्ध आहेत. हे फॉण्ट http://www.google.com/fonts/specimen/Ek+Mukta या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येऊ शकतात. यातील देवनागरी फॉण्ट मराठी, हिंदी, कोंकणी, संस्कृत, नेपाळी या भाषांमध्ये टंकलेखन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2014 रोजी प्रकाशित
फॉण्टची मुक्त दुनिया
संगणक तसेच मोबाइलवरही भारतीय भाषांचे अनेक फॉण्ट उपलब्ध आहेत. पण प्रत्यक फॉण्टमध्ये काही ना काही त्रुटी आहेच. यामुळे नवनवीन फॉण्टची निर्मिती होत असते.

First published on: 31-05-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi font launched in the market