मराठी कथा, कादंबरी यावर आधारित चित्रपट यापूर्वीही येऊन गेले. आणि कादंबरीवरचे चित्रपट काही अपवाद वगळता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात हेही दिसून आले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘तप्तपदी’च्या निमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांची कथा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. टागोर यांच्या ‘दृष्टिदान’ या कथेवर हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन सचिन नागरमोजे यांचे आहे.
‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून प्रेक्षकांपुढे आलेल्या कश्यप परुळेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. वेगळे काहीतरी करायचे, हे मी ठरविले होते. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव होता, असे कश्यप म्हणाला. कश्यपबरोबर या चित्रपटात तीन अभिनेत्री आहेत. नीना कुलकर्णी यांचा या चित्रपटातील वावर हा खास वेगळा आणि अनुभवी असा आहे. चित्रपट किंवा नाटकात भूमिका करण्यापूर्वी त्यात वेगळेपण काय आहे, ते मी नेहमी शोधत असते. ‘तप्तपदी’मधील माझी भूमिका छोटी असली तरी ती मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचे नीना कुलकर्णी म्हणाल्या. तर ‘राधा ही बावरी’मुळे घराघरात पोहोचलेली श्रुती मराठेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबाबत मलाही उत्सुकता असून प्रेक्षक त्याचे स्वागत कसे करतील त्याचाच विचार करते आहे, असे श्रुतीने सांगितले. सक्षम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीणा जामकरनेही नाजुक नातेसंबंध आणि प्रेमाची शाश्वत मूल्ये यांचे कंगोरे, त्यातील संघर्ष यात पाहायला मिळेल, असे सांगितले.
निर्माते हेमंत भावसार यांनी सांगितले की, कथा ऐकल्यानंतर यावर चित्रपट होऊ शकतो हे आमच्या लक्षात आले. सततच्या बैठका, चर्चेतून चित्रपट तयार झाला. चित्रपट पाहिल्यानंतर  प्रेक्षकांना नक्कीच वेगळे समाधान मिळेल. दिग्दर्शक सचिन नागरमोजे म्हणाला की, प्रेमाच्या नात्याची एक वेगळी अनुभूती आम्ही मांडली आहे. मानवी नातेसंबंध, भावभावना, वास्तवता आणि या सगळ्यातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
Story img Loader