उपनगरात पॉइंट ३३ इतके दिल्या जाणाऱ्या चटईक्षेत्रफळासाठी १०० टक्के शुल्क आकारण्याच्या नव्या धोरणामुळे टीडीआरचा (विकास हक्क हस्तांतरण) दर वधारणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका प्रामुख्याने पुनर्विकासासाठी पुढे येऊ घातलेल्या खासगी इमारतींना बसण्याची शक्यता आहे. या इमारतींना १.३३ इतके चटईक्षेत्रफळ मिळाले तरी पॉइंट ६७ इतक्या टीडीआरवर अवलंबून राहावे लागते. सरकारनेच चटईक्षेत्रफळाचा दर वाढविल्यामुळे टीडीआर बाळगणारे बिल्डर्सही त्यात वाढ करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
शहरातील खासगी इमारतींना १.३३ तर उपनगरातील इमारतींना एक इतके चटईक्षेत्रफळ दिले जात होते. उपनगरात मात्र दोन इतके चटईक्षेत्रफळ मिळत होते. म्हणजे आणखी एक इतका टीडीआर घेता येत होता. २०११ मध्ये उपनगरासाठीही १.३३ चटईक्षेत्रफळ लागू करण्यात आले. दोन इतके चटईक्षेत्रफळ पूर्ण करण्यासाठी पॉइंट ६७ इतका टीडीआर घेता येतो. पॉइंट ३३ इतक्या चटईक्षेत्रफळासाठी पूर्वी २००८ च्या रेडीरेकनरनुसार दर आकारला जात होता. आता २०१५ च्या रेडीरेकनरच्या ६० टक्के दर आकारला जाणार आहे. त्यामुळे चटईक्षेत्रफळाचा दर १०० टक्के होणार आहे.
टीडीआरचा सध्या बाजारातील दर चार हजार रुपये प्रति चौरस फुट आहे. या नव्या धोरणामुळे चटईक्षेत्रफळाचा दर एरियानुसार वाढणार असला तरी तो टीडीआरच्या दरापेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे पालिकेकडून चटईक्षेत्रफळ विकत घेण्याऐवजी टीडीआर घेणे बिल्डरांना सुलभ होणार आहे. परंतु त्यामुळे टीडीआरचा दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या एफएसआयसाठी आठ हजार रुपये मोजण्याऐवजी टीडीआरचा चार हजार रुपये प्रति चौरस फूट दर बिल्डरला परवडणार असला तरी त्यात आयत्यावेळी वाढ केली जाण्याची भीती काही विकासकांनी व्यक्त केली जात आहे.
 निशांत सरवणकर, मुंबई

टीडीआर म्हणजे काय?
विकास हक्क हस्तांतरण किंवा टीडीआर म्हणजे एखाद्याचा भूखंड रस्ते, उद्यान वा लोकोपयोगी कामासाठी आरक्षित असल्यास तेवढय़ाच आकाराचे चटईक्षेत्रफळ मुंबईच्या उत्तरेकडे कुठेही वापरण्याची मुभा दिली जाते, त्याला टीडीआर म्हणतात. १९९७ मध्ये झोपु योजनेतूनही टीडीआर मिळू लागला. म्हणजे झोपु योजनेतील एखाद्या भूखंडावर विक्री करावयाची इमारत बांधता येत नसल्यास त्यामोबदल्यात टीडीआर दिला जातो. उदाहरणार्थ मानखुर्दमध्ये टीडीआर (प्रिमिअम एफएसआय) मिळाल्यास उत्तरेकडे म्हणजे चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे-सांताक्रुझ, विलेपार्ले ते गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसरपर्यंत वापरता येतो.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ravi Raja provided list of 30 big property tax defaulters to Municipal Commissioner
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका

पॉइंट ३३ अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी २०१५ नुसार शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडेल. मात्र त्यामुळे टीडीआरचा दर महाग होईल हे विधान चुकीचे आहे  मोहन देशमुख, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र हौसिंग चेंबर्स ऑफ कॉमर्स

Story img Loader