‘डेन्टल इम्पांलाट’ ही दंत चिकित्सकेची नवीन शाखा असून टायटॅनियमने बनविलेले एक उपकरण जबडय़ामध्ये पडलेल्या दाताच्या ठिकाणी प्रत्यारोपित केले जाते. आधुनिक तंत्रानाचा उपयोग करून बनविण्यात आलेले हे दात जवळपास आपल्या नेसर्गिक दातांसारखेच असून ते दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात. ‘डेन्टल टुरिझम’ द्वारा सुद्धा भारतीय दंत चिकित्सा उद्योगास व त्यांच्या विकासासाठी खूप लाभ होऊ शकतो, अशी माहिती अमेरिकेतील शासकीय दंत महाविद्यालयातील प्रकल्प संचालक डॉ. मायकेल शेरर यांनी दिली.
दातांची व्यवस्थित काळजी घेतल्यास आयुष्यभर दात चांगल्या स्थितीत राहू शकतात. दातांना नियमित ब्रश करणे, ब्रश करताना मुबलक पाण्याचा उपयोग करणे, रात्री झोपण्यापूवर्ाी ब्रश करणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे ही सर्व दात मजबूत राहण्यासाठी करणे आवश्यक आहे. भारतामध्ये शासकीय आणि खाजगी मिळून २९०च्या जवळपास दंत महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रात दंत महाविद्यालय असून नागपूर आणि विविध जिल्ह्य़ात १० दंत महाविद्यालय आहेत. या दंत महाविद्यालयातून दरवर्षी सुमारे २६ हजारच्या जवळपास दंत चिकित्सक तयार होतात. ही संख्या अमेरिकेच्या तुलनेने खूप मोठी आहे, असेही डॉ. शेरर यांनी सांगितले.
अमेरिकेने दंत चिकित्सा क्षेत्रात प्रगती केली असून अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून तिथे उपचार केले जात आहेत. त्याचा उपयोग भारतातील रुग्णांना व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. अमेरिकेत दंत चिकित्सेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा प्रयोग करून नवीन तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. भारतातील अनेक दंत चिकित्सक अमेरिकेत स्थायिक झाले असून स्नातोकोत्तर शिक्षण घेत आहेत. सध्या अमेरिकेतील वार्षिक दंत चिकित्सा व्यवसाय २०० अब्ज डॉलर इतका असून दंत प्रयोगशाळांचा व्यवसाय २० अब्ज डॉलरचा आहे. भारतात मोठय़ा प्रमाणात दंत चिकित्सक व तांत्रिक कारागिरांसाठी अमेरिकेतील मोठय़ा व्यवसायात, चिकित्सा प्रबंधन आणि खाजगी क्षेत्रात सहभागी होण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा