कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने एक दिवसात १२ लाख ४ हजार लीटर दूधविक्री करण्याचा नवीन उच्चांक केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्री १ लाख ४ हजार लीटरने जादा आहे. गोकुळमार्फत मुंबई, पुणे, कोकण तसेच कोल्हापूर परिसरामध्ये गोकुळ या नावावर दुधाची विक्री करण्यात येते. ईद व सणासुदीच्या काळात गोकुळने जास्तीत जास्त दूध विक्री करण्याचा प्रत्येक वर्षी नवीन उच्चांक केलेला आहे. गोकुळने गुणवत्तेबद्दल कदापिही तडजोड केलेली नाही म्हणूनच गोकुळ ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचा मानकरी ठरला आहे. नजीकच्या काळात गोकुळ दिवसाला १५ लाख लीटर्स दूध विक्री करेल असा विश्वास अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा