मागील वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेली नागपूर- सिकंदराबाद ही आठवडय़ातून तीन दिवस धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे.
खासदार विलास मुत्तेमवार हे उद्या या गाडीला हिरवी झेंडी दाखवून तिचे उद्घाटन करतील. १२७७२ नागपूर- सिकंदराबाद त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस ९ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी रात्री १० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सिकंदराबाद येथे पोहचेल. तर १२७७१ सिकंदराबाद- नागपूर त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी रात्री १० वाजता सिकंदराबाद स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वाआठ वाजता नागपूरला पोहचेल.या गाडीला बुटीबोरी, सेवाग्राम, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, माणिकगड, सिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचेरियाल, रामगुंडम, काझीपेठ व जानगाव या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
 एसी टू टियर व एसी थ्री टियरचा प्रत्येकी १, शयनयान श्रेणीचे ८, सामान्य अनारक्षित श्रेणीचे ६ आणि दोन एसएलआर अशा १८ डब्यांसह धावणाऱ्या या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या गाडीसाठी आरक्षण शनिवार ९ मार्चपासून सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा