चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या आदल्या दिवशी ‘डायरेक्ट टू होम’ अर्थात डीटीएच सेवेद्वारे टीव्हीवरून तो चित्रपट प्रदर्शित करण्याचा पहिला प्रयत्न कमल हसनच्या ‘विश्वरूप’ या चित्रपटाद्वारे केला जाणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्येही हा चित्रपट बनविण्यात आला असून डिश टीव्हीद्वारे १० जानेवारी रोजी दाखविला जाणार आहे. तर ११ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांतून प्रदर्शित केला जाणार आहे.
आतापर्यंत नवीन चित्रपट एकाच वेळी जास्तीत जास्ती चित्रपटगृहांतून प्रदर्शित करायचा आणि पहिल्या तीन-चार दिवसांत मोठा गल्ला गोळा करायचा, असा प्रघात होता. काही चित्रपटांचे परदेशी हक्क विकून त्याद्वारे मोठा गल्ला गोळा करण्याचाही मार्ग आता चांगला प्रशस्त झाला आहे. मात्र, कमल हसनने  ‘विश्वरूप’ चित्रपटाद्वारे सर्वत्र प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी डीटीएच सेवेद्वारे चित्रपट प्रदर्शित करण्याचा नवा ट्रेण्ड आणला आहे. डीटीएच तंत्रज्ञानामार्फत अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे. हिंदीतील ‘विश्वरूप’ पाहण्यासाठी डीटीएटचधारकांना ५ जानेवारीपर्यंत ५०० रुपये भरून हा चित्रपट १० जानेवारीला पाहता येईल. या चित्रपटाला डीटीएचधारकांनी प्रतिसाद दिला तर यापुढे केवळ डीटीएचधारकांसाठी चित्रपट बनवून डीटीएच सेवेद्वारेच प्रदर्शित करण्याचा आणखी एक नवा ट्रेण्डही येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या चित्रपटाला डीटीएचधारकांनी प्रतिसाद दिला तर यापुढे केवळ डीटीएचधारकांसाठी चित्रपट बनवून डीटीएच सेवेद्वारेच प्रदर्शित करण्याचा आणखी एक नवा ट्रेण्डही येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा