नववर्षांच्या आदल्या दिवशी पोलिसांची मोठी धावपळ असते. शहरांमध्ये मद्यपान करून दुचाकी भरधाव नेणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. उशिरा रात्रीपर्यंत आतषबाजी होते. आनंदाचे नाना प्रकार. साजरा करण्याच्या नाना तऱ्हा. पण बीड आणि लातूर या दोन्ही शहरांनी नववर्षांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

३१ डिसेंबरच्या रात्री स्वागतासाठी फटाके वाजविले जातात. ‘आनंदा’साठी नाना मार्ग वापरणारे अनेक महाभाग आहेत. कोणी रस्त्यावर झिंगतो, तर कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘राडा’ करून जातो. बीडमध्ये मात्र नवीन वर्षांची सुरुवात हरिनामाच्या जयघोषाने करणारे हजारो नागरिक आहेत. मध्यरात्री १२ वाजता नवीन वर्षांचे स्वागत टाळमृंदगाच्या गजरात व हरिनामाच्या संकीर्तनात केली जाते. बुधवारी मध्यरात्री निवृत्तीमहाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या कीर्तनाने नवीन वर्ष साजरे झाले. कारण होते स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान.
३१ डिसेंबर ते ११ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. घराघरात स्थानिक दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम पाहणारेही अनेक जण असतात. पण बीड शहरात या कीर्तन महोत्सवाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी स्थानिक केबलचालकाकडून अनेकांनी जोडणी मागून घेतली. या महोत्सवाची लोकप्रियता या वरून दिसून येते. स्काउट आणि गाइडचे राष्ट्रीय आयुक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ११ वाजता निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. गर्दीचे उच्चांक मोडून काढणाऱ्या या कीर्तनात मध्यरात्री १२ वाजता नवीन वर्षांचे स्वागत हरिनामाचा जागर आणि टाळ मृदुगांच्या गजरात करण्यात आला. साध्वी प्रीतिसुधाजी यांचेही महोत्सवात १० दिवस प्रवचन होणार आहे. या वेळी केशव महाराज जगदाळे, भरतबुवा रामदासी, गौतम खटोड, सुशील खटोड आदी उपस्थित होते.