स्वातंत्र्यपूवरेत्तर काळात वृत्तपत्रांनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी जनमानसात चेतना जागृत केली. समाजाला दिशा दिली. समाजातील अनिष्ठ रुढींवर प्रहार केला. सामाजिक व राजकीय घडामोडी शस्त्र म्हणून होते. यामुळे वृत्तपत्राला समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन बल्लारपूरचे ठाणेदार यशवंत ओंबासे यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून रंगभरण स्पर्धा पुरस्कार वितरण, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रणजितसिंह अरोरा होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत कुलदीपसिंग सुरी, दादाभाई पॉटरीजचे व्यवस्थापक संजयकुमार पोतदार, पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर रणदिवे, संघाचे अध्यक्ष पद्माकर पांढरे व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, थापर हायस्कूलचे शिक्षक राजू श्रीपाद, बालाजी हायस्कूल बामणीचे शिक्षक शैलेजा फटाले, के. जी. एन. कॉन्व्हेंटच्या प्राचार्य शमीन शबीर,  विसापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विजया पंधरे यांना महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सन्मानपत्र व स्मृतीपत्र बहाल करून सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी नगरसेवक इंदू बोंडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिकाप्रसाद गुप्ता व राजकीय क्षेत्रातील सुरेश रामगुंडे यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर पांढरे यांनी केले. संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी तर आभार अनेकश्वर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय रासेकर, रमेश निशाद, सुजय वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Story img Loader