मध्य रेल्वेतील ट्रेड युनियनच्या मान्यतेसाठी झालेल्या एकूण मतदानात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयु) या सर्वात जुन्या संघटनेने एकूण मतदानाच्या ४६ टक्के मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला तर सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने ३८ टक्के मतांसह दुसरा क्रमांक मिळविला. सेंट्रल रेल्वेत मान्यतेसाठी असलेले निकष दोन्ही युनियनमार्फत पूर्ण होत असल्याने एनआरएमयु आणि सीआरएमएस या दोन्ही संघटनांना मान्यताप्राप्त संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ट्रेड युनियनच्या मान्यतेसाटी गुप्त मतदान झाले होते. दर पाच वर्षांनी ही निवडणूक होते. मागील वेळीही या दोन्ही संघटना मान्यताप्राप्त संघटना म्हणून घोषित झाल्या होत्या. युनियन मान्यतेचा हा निकाल मनमाडला येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एनआरएमयुच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन पुन्हा विजयी
मध्य रेल्वेतील ट्रेड युनियनच्या मान्यतेसाठी झालेल्या एकूण मतदानात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयु) या सर्वात जुन्या संघटनेने एकूण मतदानाच्या ४६ टक्के मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला तर सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने ३८ टक्के मतांसह दुसरा क्रमांक मिळविला.
First published on: 04-05-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nfir union won again in central railway trade union election