मोदींचे नेतृत्व मानण्याचा प्रश्न नाही, मात्र राज्यात युतीबरोबर आहे, असे रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगितले. सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे. याचा पुनरुच्चार करीत ३० ऑक्टोबपर्यंत जागावाटप पूर्ण करा, असेही आठवले म्हणाले.
हडको येथील टीव्ही सेंटर मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. सभेदरम्यान मोठा पाऊस आल्याने श्रोत्यांनी मात्र चांगला उपाय काढला. ज्या खुर्चीवर बसले, ती खुर्चीच डोक्यावर घेतली. त्यामुळे आठवले यांच्या सभेचे नवेच दृश्य दिसत होते. रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या ३, राज्यसभेची १, तर विधानसभेच्या ३० जागा मिळायला हव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली. मोदी यांचे नेतृत्व आठवले यांना मान्य आहे काय, असा प्रश्न केला जात होता. यावर आठवले यांनी वरील भाष्य केले. सभेला मोठय़ा संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

Story img Loader