प्रबोधनाची परंपरा रुजविण्याचे काम राज्यात अनेकांनी केले. समाज परिवर्तनाचे विचार रुजविताना अनेकांनी उपेक्षा सहन केली. मात्र पुरोगामी संघटनांमध्ये संवाद राहिला नाही. तो असण्याची आवश्यकता आहे, असे मत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. प्रवीण वाघ स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते. या वेळी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सय्यद कासमभाई यांना प्रवीण वाघ स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यात प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. डॉ. दाभोलकरांसारख्या अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपेक्षा सहन केली. मात्र पुरोगामी विचारांच्या संघटनांमध्ये अधिक संवाद निर्माण झाला तर चांगले काम उभे राहू शकते, असे मोरे म्हणाले. पुरोगामित्व जपणे म्हणजे काय, हेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी जन परिषदेचे अध्यक्ष सुभाष लोमटे होते. वाळूज, चिखलठाणा, जाधववाडी, जुना मोंढा येथील कामगार कागद व काचपत्रा वेचणारे अनेक जण कार्यक्रमास सहभागी झाले होते.

Story img Loader