यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना जे वैभव, कीर्ती, पाठबळ व जनतेचे प्रेम मिळाले ते आताच्या नेत्यांना का मिळत नाही याबाबत त्यांनीच आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रतापराव भोसले यांनी केले.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सांगतेचा कार्यक्रम भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाला. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू होते. चव्हाण यांच्या कारकिर्दीचा विस्तृत आढावा भोसले यांनी घेतला. विकासाची गंगा राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला. पंचायत राज सारखे त्यांचे अनेक निर्णय दूरगामी ठरले. ज्यांनी विरोध केला त्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्याइतका उदार दृष्टीकोन चव्हाण यांनी ठेवला असे भोसले म्हणाले.
व्यासपीठाचे अध्यक्ष रामनाथ वाघ यांनी प्रास्तविक केले. राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष योगीराज खोंडे, लिंबाशेठ नागरगोजे, दा. र. सुतार गुरूजी तसेच पुरूषोत्तम खेडेकर यांना यावेळी व्यासपीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. व्यासपीठाच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरणही यावेळी झाले. माजी आमदार नरेंद्र घुले, शंकरराव घुले, जी. डी. खानदेशे, दीपलक्ष्मी म्हसे, संपतराव म्हस्के, गुलाबराव काळे, आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष खासेराव शितोळे, राजेंद्र निंबाळकर, अरूण गांगुर्डे, प्राचार्य बी. एच. झावरे, ए. एस. राजू, मतकर, आर. बी. कुलट, पी. एम. काळे या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा