मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आर्थिक व जागतिक मंदी असल्याचे सांगत प्रशासनानेच मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय  घेतला होता. स्थायी समितीच्या मंजुरीनतर महासभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
मागील आर्थिक वर्षांत निवासी मालमत्ता करांचे दर करपात्र मूल्यांचा ३२.६७ टक्के  होते, तर अनिवासी व औद्योगिक मालमत्ता करांचे दर करपात्र मूल्यांच्या ५३.३ टक्के इतके होते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंदीचे कारण पुढे करत मालमत्ता दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader