भारतात सर्वाधिक मोठे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) गेल्या काही वर्षांत खास संशोधनच झाले नसल्याची बाब उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाला देशाच्या विकासात महत्त्वाचे स्थान असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकतेच देशभरातील विविध शासकीय रुग्णालयांना विचारणा केली. त्यात मेडिकलचाही समावेश होता. एखाद्या विषयावर संशोधन सुरू आहे काय, अशी माहिती परिषदेने विचारली होती. या प्रश्नाच्या उत्तरात मेडिकलमध्ये सध्या तरी कोणत्याही विषयावर एकही प्राध्यापक संशोधन करत नसल्याचे सांगण्यात आले. मेडिकलमध्ये विविध विभागात जवळपास अडीचशे डॉक्टर्स सेवा देतात. या अडीचशेपैकी एकही प्राध्यापक संशोधन करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाच वषार्ंपूर्वी चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका व्यक्तीला जनावरांना होणारा ‘ट्रिपोमोसेमिया’ हा आजार झाला होता. त्याच्यावर मेडिकलमध्ये जवळपास एक वर्षे उपचार सुरू होते. तो या आजारातून बरा झाला. यावर डॉ. प्रशांत जोशी यांनी एक संशोधन केले होते. यानंतर मेडिकलमध्ये एकही संशोधन झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा