भारतात सर्वाधिक मोठे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) गेल्या काही वर्षांत खास संशोधनच झाले नसल्याची बाब उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाला देशाच्या विकासात महत्त्वाचे स्थान असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकतेच देशभरातील विविध शासकीय रुग्णालयांना विचारणा केली. त्यात मेडिकलचाही समावेश होता. एखाद्या विषयावर संशोधन सुरू आहे काय, अशी माहिती परिषदेने विचारली होती. या प्रश्नाच्या उत्तरात मेडिकलमध्ये सध्या तरी कोणत्याही विषयावर एकही प्राध्यापक संशोधन करत नसल्याचे सांगण्यात आले. मेडिकलमध्ये विविध विभागात जवळपास अडीचशे डॉक्टर्स सेवा देतात. या अडीचशेपैकी एकही प्राध्यापक संशोधन करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाच वषार्ंपूर्वी चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका व्यक्तीला जनावरांना होणारा ‘ट्रिपोमोसेमिया’ हा आजार झाला होता. त्याच्यावर मेडिकलमध्ये जवळपास एक वर्षे उपचार सुरू होते. तो या आजारातून बरा झाला. यावर डॉ. प्रशांत जोशी यांनी एक संशोधन केले होते. यानंतर मेडिकलमध्ये एकही संशोधन झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स शासकीय सेवेनंतर खासगी रुग्णालयात सेवा देतात. त्यामुळे त्यांचे सर्व लक्ष देशाच्या विकासापेक्षा स्वत:च्या विकासाकडे अधिक असते. वैद्यकीय क्षेत्रात खास संशोधन करणाऱ्यांना काही संस्था निधी उपलब्ध करून देतात. त्यामध्ये टाटा, रिलायन्स व अन्य संस्थांचा समावेश आहे. परंतु डॉक्टर्स संशोधन करण्यास रुची दाखवत नसल्याने हा निधी तसाच शिल्लक राहात असल्याचेही सांगितले जाते. डॉक्टर्स कोणत्याही विशेष विषयावर संशोधन करत नसले तरी औषध कंपन्यांच्या संशोधनावर मात्र त्यांचे लक्ष असते. औषध कंपन्या आपली औषधे बाजारात आणण्यासाठी संशोधन करतात. मेडिकलमध्ये जवळपास पाच औषध कंपन्या असे संशोधन करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हे संशोधन या कंपन्यांसाठी लाभदायक असतात, त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष
दिले जाते.
मेडिकलमध्ये खास संशोधनच नाही!
भारतात सर्वाधिक मोठे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) गेल्या काही वर्षांत खास संशोधनच झाले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2015 at 01:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No special amendment in government medical college and hospital