सातारा येथील जानकीबाई झंवर शाळेतील मुलीवर अत्याचार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.
या प्राथमिक शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार संस्थाचालकांनी शुक्रवारी सातारा पोलिसात दाखल केली आहे.
या प्रकरणात शाळेतील शिक्षक सुरेश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या पालकांचा व मुलीचा जबाब घेतला. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले नाही. या गुन्हय़ातील शिक्षक अद्याप फरार आहे. जनरेटय़ामुळे संस्थाचालकांनी हा तक्रार दाखल केली होती, तरीही या शिक्षकावर लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader