मराठवाडय़ातून चारधाम यात्रेस गेलेल्या व्यक्तींना मदत करता यावी, या उद्देशाने मराठवाडय़ातून पाच प्रशासकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय पथक उद्या (शनिवारी) डेहराडूनला रवाना होत आहे. उपजिल्हा अधिकारी महेंद्र हरपाळकर पथकाचे प्रमुख आहेत. मराठवाडय़ातून २०२जणांचा संपर्क होत नसल्याची माहिती प्रशासनाकडे होती. अधिकाधिक लोकांपर्यंत संपर्क व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून मराठवाडय़ातून गेलेल्या यात्रेकरूंना सुविधा देता यावी, यासाठी पथकाचे प्रयत्न असतील. पथकात तहसीलदार रूपेश शिनगारे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, नायब तहसीलदार आर. एम. मुंडलोड व लिपिक वैभव भाले, याबरोबरच शासकीय वैद्यकीय अधिकारी मोहम्मद अन्सारी, वैजिनाथ राठोड, डॉ. सचिन सोळंके, डॉ. चंद्रशेखर गायके व डॉ. पवन जाधव यांचा समावेश आहे. पथकास ९४२२९७७६७७, ८४२२८७५८०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा