सार्वजनिक स्वच्छता ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे गांभीर्य जोपर्यंत व्यक्तीला पर्यायाने समाजाला समजणार नाही तोपर्यंत शासन, प्रशासन आणि समाज यांच्याकडून या स्वच्छतेच्या समस्येचे निराकरण होणार नाही. त्यासाठी अभ्यासक्रमात स्वच्छतेचे समाजशास्त्र हा विषय समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे मत सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशनचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वेळोवेळी चालविण्यात येणाऱ्या समाजप्रबोधनाच्या जाणीवजागृतीच्या आणि आर्थिक सहायाच्या योजना स्वच्छतेच्या मोहिमेला गती देण्यासाठी आवश्यक आहे. परंतु त्या मात्र पुरेशा नाही हे लक्षात येते. गेल्या महिन्यात दिल्ली येथे सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशन व सुलभ इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅक्शन सोशिओलॉजी या संस्थांच्या वतीने दोन दिवसीय परिषद घेण्यात आली. त्या स्वच्छतेचे समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रमातसमावेश करण्यावर एकमत झाले. या परिषदेला लोकसभेच्या अध्यक्ष मीराकुमार, केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश, केंद्रीय पेयजल व सार्वजनिक स्वच्छता राज्यमंत्री भरतसिंग सोलंकी यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण तज्ज्ञ, कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते.
बिंदेश्वर पाठक यांनी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात हा विषय समाविष्ट करण्यासंदर्भात विचार झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच महाविद्यालयीन आणि शालेय स्तरावर हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या ३० र्वापासून सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशन ही संस्था कार्यरत असून या संस्थेने १३ लाख शौचालये आणि ८ हजार शोचालय संकुले उभारली आहेत. शासनाने ५४ दशलक्ष शौचालये सुलभ शौचालयाच्या धरतीवब उभारली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था केंद्र सरकारच्या संपूर्ण स्वच्छता अभियानात कार्यरत आहेत. अजूनही ४० टक्के घरांना अद्यापही स्वच्छ वापरात असलेले शौचालये उपलब्ध नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सार्वजनिक स्वच्छतेचे कुणालाच गांभीर्य नाही – बिंदेश्वर पाठक
सार्वजनिक स्वच्छता ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे गांभीर्य जोपर्यंत व्यक्तीला पर्यायाने समाजाला समजणार नाही तोपर्यंत शासन, प्रशासन आणि समाज यांच्याकडून या स्वच्छतेच्या समस्येचे निराकरण होणार नाही. त्यासाठी अभ्यासक्रमात स्वच्छतेचे समाजशास्त्र हा विषय समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे मत सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशनचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
First published on: 21-02-2013 at 05:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobody has value of public cleaness bindeshwar pathack