दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वाहिनीतर्फे मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी देण्यात येणाऱ्या चौथ्या सह्याद्री चित्रपट पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यंदा ‘सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट’ या विभागासाठी ‘काकस्पर्श’, ‘धग’ आणि ‘अिजठा’ यांच्यात चुरस आहे. एकूण विविध २० विभागांसाठीची ही नामांकने आहेत.
‘सह्याद्री’ वाहिनीचे संचालक मुकेश शर्मा यांनी बुधवारी या पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा केली. पुरस्कार वितरण सोहोळा १८ जून रोजी रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये किरण शांताराम, एन. चंद्रा, समृद्धी पोरे, दिलीप ठाकूर, कुमार सोहोनी, मीनल जोगळेकर आदींचा समावेश होता. या सोहोळ्याचे सूत्रसंचालन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर करणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
विविध गटासाठीची नामांकने पुढीलप्रमाणे
सवरेत्कृष्ट कथा-काकस्पर्श (उषा दातार), मोकळा श्वास (अनुराधा वैद्य), इन्व्हेस्टमेंट (रत्नाकर मतकरी)
सवरेत्कृष्ट पटकथा- श्यामचे वडिल (अजय पाठक, आर. विराज), पुणे ५२ (निखिल महाजन), शूर आम्ही सरदार (रमेश मोरे)
सवरेत्कृष्ट संवाद-भारतीय म्हंजी काय रं भाऊ (संजय पवार), काकस्पर्श (गिरीश जोशी), श्री पार्टनर (व. पु. काळे, समीर सुर्वे)
सवरेत्कृष्ट गीतकार- अजिंठा (ना. धों. महानोर), तुकाराम (दासू वैद्य), धग (शिव कदम)
सवरेत्कृष्ट संगीत- अजिंठा (कौशल इनामदार), तुकाराम (अशोक पत्की, अवधुत गुप्ते), आयना का बायना (अजित-समीर)
सवरेत्कृष्ट पाश्र्वगायक- तुकाराम (जगण्याचा पाया-ज्ञानेश्वर मेश्राम), बालक पालक (कल कल्ला- विशाल ददलानी), श्री पार्टनर (गीत माझ्यात चांद रुजला-स्वप्नील बांदोडकर)
सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिका- श्री पार्टनर (भिनी भिनी-मधुश्री), अजिंठा (मनचिंब पावसासाठी- हंसिका अय्यर), कुरुक्षेत्र (कमळात राहतो भुंगा- बेला शेंडे)
सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीत- शूर आम्ही सरदार (महेश नाईक), पुणे ५२ (अतिफ अफजल, ह्यून जंग शीम), अिजठा (कौशल इनामदार)
सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शक- अिजठा (नितीन चंद्रकांत देसाई), मसाला (प्रशांत बिडकर), काकस्पर्श (प्रशांत राणे, अभिषेक विजयकर)
सवरेत्कृष्ट छायाचित्रण- अिजठा (राजीव जैन), पुणे ५२ (जेरेमी रिगम), तुकाराम (राजन कोठारी)
सवरेत्कृष्ट संकलन- अिजठा (प्रशांत खेडेकर), सत्य, सावित्री आणि सत्यवान (सर्वेश परब), पुणे ५२ (अभिजित देशपांडे)
सवरेत्कृष्ट ध्वनी- म्हंजी काय रं भाऊ (मनोज मोचेमाडकर), हालक पालक (रोहित प्रधान), शूर आम्ही सरदार
सवरेत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- आयना काय बायना (उमेश जाधव), अजिंठा (सुभाष नकाशे), कुरक्षेत्र (फुलवा खामकर)
सवरेत्कृष्ट पदार्पण- मोकळा श्वास (मृण्मयी देशपांडे), श्यामचे वडिल (चिन्मय उटदीकर), जय जय महाराष्ट्र माझा (अनुषा दांडेकर)
सवरेत्कृष्ट बालकलाकार- धग (हंसराज चव्हाण), बालक पालक (प्रथमेश परब), चिंटू (शुभंकर अत्रे)
सवरेत्कृष्ट अभिनेत्री- धग (उषा जाधव), कुटुंब (वीणा जामकर), काकस्पर्श (प्रिया बापट)
सवरेत्कृष्ट अभिनेता- अनुमती (विक्रम गोखले), काकस्पर्श (सचिन खेडेकर), मसाला (गिरीश कुलकर्णी)
सवरेत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- बालक पालक (उत्तुंग ठाकूर, रवी जाधव, रितेश देशमुख), श्यामचे वडिल (अजय पाठक), नाईट स्कूल (नितीन मवानी)
 सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- काकस्पर्श (महेश वामन मांजरेकर), धग (शिवाजी लोटण-पाटील), पुणे ५२ (निखिल महाजन)
आणि सवरेत्कृष्ट चित्रपट- काकस्पर्श (ग्रेट मराठा एन्टरटेंटमेंट एम. एल.पी.), धग (जयश्री मोशन पिक्चर्स)
अिजठा (आयक़निक चंद्रकात प्रॉडक्शन प्रा. लिमिटेड)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा