विद्युत जोडणी घ्यायची असल्यास आता महापालिकेचे ना-हरकरत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरात मनपा हद्दीत मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकामे व अतिक्रमणे होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी विद्युत जोडणी बंधनकारक करणे गरजेचे आहे. रस्ते, खुल्या जागा, रस्त्याच्या काठावरील जागेवर अतिक्रमण, चौकातील जागेवर अवैध बांधकाम व अतिक्रमण होत असल्यामुळे रुग्णवाहिका व अग्निशामक वाहन जागेकरिता अडथळा निर्माण होत आहे. या सर्व प्रकारची शहानिशा न करता परस्पर विद्युत पुरवठा कंपनीकडून होत असल्यामुळे आता विद्युत जोडणी घ्यायची असल्यास मनपाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
यासर्व प्रकरणी चंद्रपूर मनपात बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले असून यात ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय विद्युत जोडणी देता येणार नाही, मनपा हद्दीतील मोबाईल टॉवर ज्यांना मनपाकडून ना-हरकत प्रमाणपत्र नाही अशांना नोटीस बजावून विद्युत पुरवठा खंडीत करावा व योग्य ती कारवाई करावी, मनपाकडून वाणिज्य प्रयोजनार्थ असलेल्या बांधकामांमध्ये ज्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नाही त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा व आरक्षणे यांना बाधित करणाऱ्या बांधकामांबाबत विभागीय आयुक्तांकडून उचित कारवाई करण्यात यावी, आदी मुद्यांचा समावेश आहे.
वीज जोडणीसाठी महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीचे
विद्युत जोडणी घ्यायची असल्यास आता महापालिकेचे ना-हरकरत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
आणखी वाचा
First published on: 29-07-2014 at 07:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non objection certificate from the municipalis compulsory for connection electricity