माधुरी दीक्षितची स्पष्टोक्ती
ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या माधुरी, करिष्मा आणि श्रीदेवी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर आल्या आहेत. मात्र आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही, असे दस्तुरखुद्द माधुरी दीक्षित हिने स्पष्ट केले आहे. ‘देढ इष्किया’ आणि ‘गुलाब गँग’ या दोन चित्रपटांमधून माधुरी आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर गेल्या वर्षी ‘डेंजरस इष्क’ या चित्रपटातून करिष्माने व ‘इंग्लिश विंग्लिश’मधून श्रीदेवीने पुन:पदार्पण केले होते.स्पर्धेवर आपला कधीच विश्वास नव्हता. मला जे आवडत होते, तेच मी केले आहे. पुढेही आपल्याला जे करण्यात आनंद मिळेल, तेच आपण करू, असे माधुरीने स्पष्ट केले. ‘गुलाब गँग’ आणि ‘देढ इष्किया’ या दोन्ही चित्रपटांमध्ये माधुरीला प्रमुख भूमिका आहे. सामाजिक अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महिलांच्या एका टोळीवर ‘गुलाब गंज’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात माधुरीसह जुही चावला, माही गिल, शिल्पा शुक्ला यांचा समावेश आहे. जुहीबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता, असे माधुरीने सांगितले. विशाल भारद्वाज निर्मित ‘इष्किया’ या चित्रपटाच्या पुढील भागात, ‘देढ इष्किया’मध्येही माधुरी महत्त्वाची भूमिका करत आहे. या चित्रपटात ‘इष्किया’मध्ये काम केलेले नासीरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी हे दोघही माधुरीसह प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा