दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी आपली तुलना करणे योग्य ठरणार नाही. त्यांचा जावई असलो तरी सिनेमासृष्टीत येण्यासाठी किंवा प्रस्थापित होण्यासाठी त्यांची मदत घेतली नाही वा कोणता गैरफायदाही आपण कधीच घेतला नाही, असे ‘कोलावरी डी’फेम गायक-गीतकार आणि अभिनेता धनुषने स्पष्ट केले. रजनीकांतची कन्या ऐश्वर्या हिच्याशी २००४ साली धनुषचा विवाह झाला. स्वत:च्या हिमतीवरच आपण सिनेमासृष्टीत आलो असे धनुषने स्पष्ट केले.
रजनीकांत यांची अभिनयशैली, काम करण्याची पद्धत आणि माझी पद्धत यात जमीनअस्मानाचा फरक आहे. ते ‘आयकॉन’ आहेत आणि मी नवीन आहे. त्यामुळे त्यांच्याशी आपली तुलनाच होऊ शकत नाही, असे धनुष म्हणाला. ‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे धनुष हिंदीत पदार्पण करतो आहे. आनंद एल राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांच्यासोबत आणखी एक हिंदी चित्रपट करणार असल्याचेही धनुषने जाहीर केले. ‘रांझणा’ या चित्रपटात सोनम कपूर-धनुष ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा