आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सहार उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाबाबत वाहनधारकांची गफलत होत असल्याचे वृत्त ‘वृत्तान्त’मध्ये झळकल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाकडे जायचे नसल्यास वाहनधारकांनी पाल्र्याच्या उड्डाणपुलावरून उतरताना उजव्या बाजूची मार्गिका वापरू नये, वाहन डावीकडे ठेवत पुढे जावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून अवघ्या पाच मिनिटांत थेट मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी सहार उन्नत मार्ग प्रकल्प खुला झाला खरा; पण दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी करण्यात आलेल्या भुयारी मार्ग वापरण्याबाबतच्या सूचना नीट लक्षात येत नसल्याने अनेक वाहनधारक गफलतीने भुयारी मार्गाकडे जात आहेत. आपण भलत्याच रस्त्यावर लागल्याचे लक्षात आल्यावर ते परत फिरण्यासाठी वळतात. या गडबडीत भुयारी मार्गाच्या तोंडावरच वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यातून मोठा अपघात होण्याची भीती आहे. याबाबतचे वृत्त ‘वृत्तान्त’मध्ये प्रकाशित झाले होते.
त्यानंतर जाग आलेल्या ‘एमएमआरडीए’ने वाहनधारकांसाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या आहेत. दक्षिण मुंबईहून भुयारी मार्गाकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने रस्ता आहे. उड्डाणपुलावरून उजव्या मार्गिकेतून आलेली वाहने थेट या भुयारी मार्गाकडे जातात व त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे विमानतळाकडे जायचे नसल्यास वाहनधारकांनी उजव्या बाजूने उतरू नये, डाव्या बाजूला वाहन ठेवत थेट अंधेरीकडे जाणारी मार्गिका वापरावी, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
विमानतळाकडे जायचे नसल्यास उजवी मार्गिका वापरू नका
आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सहार उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाबाबत वाहनधारकांची गफलत होत असल्याचे वृत्त ‘वृत्तान्त’मध्ये झळकल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 22-02-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not take the right most lane of the flyover mmrda