ररस्त्यावर प्लास्टिक पिशव्या व कचरा फेकणाऱ्या शहरातील १९ हॉटेल, तसेच खानावळचालक व ज्युस सेंटर मालकांना परभणी शहर महापालिकेने सोमवारी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. हॉटेलमालकांना खुलासा करण्यास २४ तासांची मुदत असून दोषी आढळल्यास ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
शहरात हॉटेलचालक, तसेच रस्त्याच्या बाजूला किरकोळ व्यवसाय करणारे व्यापारी कचरा सर्रास रस्त्यावर वा दुकानासमोरील नालीत टाकतात. नागरिकही बांधकामास आणलेली रेती, वीट, लोखंड रस्त्यावर टाकतात. रस्त्यावर टाकलेली वाळू नाल्यात जाऊन पाणी तुंबते व हे पाणी रस्त्यावरून वाहते. एकूणच कचराकुंडी वा घंटागाडीचा वापर होत नसल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त होत आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मनपाने घेतला व कर्मचाऱ्यांमार्फत शहरात पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी व्यापारी कचरा रस्त्यावर टाकताना दिसून आले. सोमवारी सहायक आयुक्त मुजीब खान, स्वच्छता विभागप्रमुख करण गायकवाड यांनी एकूण १९जणांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा