भाजप नेते आणि यवतमाळचे  नगराध्यक्ष योगेश गढीया यांनी खुलेआम रॅलीत भाग घेऊन कांॅग्रेस उमेदवार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा प्रचार केला म्हणून भाजपने गढीया यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्यात भाजप-सेनेची महायुती असतांना यवतमाळ-वाशीम मतदारसंघात सेनेच्या खासदार गवळी उभ्या असतांना गवळींचा प्रचार न करता कांॅग्रेसच्या मोघेंचा प्रचार का केला, तुम्हाला पक्षातून निलंबित का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे यांनी त्यांच्यावर बजावली आहे. उल्लेखनीय म्हणजे, योगेश गढीया यांना नगराध्यक्ष पदावरून खाली खेचण्यासाठी भाजपनेच गढीयाविरुध्द अविश्वास ठराव आणला होता. गढीया यांनी कांॅग्रेसची मदत घेऊन अविश्वास ठराव फेटाळण्यात यश मिळवले होते. दरम्यान, योगेश गढीया यांच्याविरोधात तक्रार न करण्याचा संयम खासदार भावना गवळी यांनी दाखविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा