नव वर्षांच्या सुरुवातीला अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता धूसर होत आहे. जलसंपदा विभागाचे अकोला महापालिकेकडे असलेली सुमारे ८४ लाख रुपयांची थकबाकी पाहता जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नि.जा. बांबल यांनी ३१ डिसेंबपर्यंत थकबाकी अदा न केल्यास पाणी पुरवठा पूर्वसूचना न देताच बंद करण्यात येईल, अशी नोटीस महापालिकेला पाठविली आहे.
अकोला महापालिका अकोला शहरासाठी पिण्याचे पाणी व इतर उपयोगासाठी काटेपूर्णा धरणातील पाण्याचा वापर करते. या धरणातील पाणी वापराची एकूण पाणीपट्टी ७३ लाख ९३ हजार रुपये व मोर्णा प्रकल्पातून पाणी वापराची पाणीपट्टी ९ लाख ९५ हजार रुपये, अशी एकूण ८३ लाख ८८ हजार रुपयांची पाणीपट्टी थकित आहे.
ही पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेला जलसंपदा विभागाने वारंवार पत्र लिहिले, पण याकडे महापालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत ही थकबाकी भरण्याची गरज जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नि.जा.बांबल यांनी एका नोटिसीद्वारे महापालिकेला कळविले आहे. ही थकबाकी अदा न केल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचेही त्या म्हटले आहे. त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा