जळगाव जामोद पालिकेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. किशोर केला यांना त्यांच्या सुरू असलेल्या अवैध बांधकामाला रोखण्याबाबत नोटीस देण्यात आली असून १५ दिवसांच्या आत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत.
खेल अमानत गट नं. ८ मध्ये स्वीकृत नगरसेवक डॉ. किशोर केला व प्रतीक पुरुषोत्तम राठी (रा. जामोद) यांनी अवैध बांधकामाला सुरुवात केली असून यासाठी पालिकेची कुठलीही परवानगी त्यांनी घेतली नाही. हा प्रकार आपल्या पदाचा गैरवापर करून करण्यात आल्याचे उघड झाल्याने नगरपालिका प्रशासनाने त्यांना यासंदर्भात नोटीस दिली असून या जागेसंदर्भातील जमिनीचे अकृषक आदेश, अधिन्यास मंजुरी, ले-आऊट नकाशा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले असून संबंधित बांधकाम थांबविण्यास सांगितले आहे. वरील बाबींची पूर्तता न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३, ५४ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत म्हटले आहे. नगरसेवकाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या स्वार्थासाठी नियमांना धाब्यावर बसविले आहे.
अवैध बांधकाम हा त्यातील मोठा पुरावा आहे. अशा नगरसेवकाला त्याच्या पदावरून पायउतार करण्याची मागणी जनता करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणात  लक्ष घालावे यामुळे  शहरातील अवैध बांधकामांना आळा बसेल.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा