महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक निकालानंतर नगराध्यक्ष निवडीपूर्वी दोन वर्षांपूर्वी राजकीय संघर्षातून दोन गटात मारामारी प्रकरणातून आमदार मकरंद पाटील यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्याप्रकरणी महाबळेश्वर न्यायालयाने या प्रकरणाचे तपासी पोलीसी निरीक्षक एन. बी. कोहिनकर यांना नोटीस काढली आहे. याप्रकरणी दि. २६ जुलै रोजी म्हणने सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पालिका निवडणूक निकालानंतर महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत नगरसेवक व लोकमित्र जनसेवा आघाडीतील नगरसेवक व समर्थक कार्यकर्त्यांत हाणामारी झाली होती. यावेळी नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर व त्यांचे चिरंजीव संदीप कोंढाळकर यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी कोंढाळकर यांनी पोलिसात १२ जणांविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये आमदार मकरंद पाटील यांचेही नाव होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित कदम यांनीही महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर व लक्ष्मण कोंढाळकर यांच्यासह काही जणांवर तक्रार दिली होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एन. बी. कोहीनकर यांच्याकडे होता. त्यांनी आरोपपत्र दाखल करताना आ. पाटील यांचे नाव वगळले. ही बाब लक्ष्मण कोंढाळकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना योग्य ते उत्तर मिळू शकले नाही. म्हणून त्यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली व त्यासाठी वेगळी याचिका दाखल केली व आमदारांचे नाव दाखल करण्याची व मूळ आरोपातून आमदारांचे नाव वगळणारे तपासी अधिकारी कोहिनकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. न्यायालयाने या प्रकरणी कोहिनकर यांना नोटीस बजावली व आपले म्हणने दि. २६ जुलै रोजी दाखल करण्याचे आदेश दिले.
आमदारांचे नाव आरोपपत्रातून वगळल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकास नोटीस
राजकीय संघर्षातून दोन गटात मारामारी प्रकरणातून आमदार मकरंद पाटील यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्याप्रकरणी महाबळेश्वर न्यायालयाने या प्रकरणाचे तपासी पोलीसी निरीक्षक एन. बी. कोहिनकर यांना नोटीस काढली आहे
First published on: 26-07-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to police inspector for omitting mlas name from chargesheet