राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जुलै ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्य़ातील ७४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ जूनला मतदान असून २४ जूनला मतमोजणी होणार आहे.
आजच (दि.२८) या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार ४ जून ते ८जून दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. छाननी १० जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे. त्याचदिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांची अंतीम यादी व निवडणूक चिन्ह जाहीर केले जाईल. त्यानंतर २३ जूनला मतदान व २४ जूनला मतमोजणी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने निश्चित करण्यात येईल.
नगर तालुका व राहाता येथे फक्त एका (अनुक्रमे वडगाव गुप्ता व चितळी) ग्रामपंचायतीची निवडणूक असून सर्वात जास्त म्हणजे १२ ग्रामपंचायती शेवगाव तालुक्यात आहे. अन्य तालुक्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या याप्रमाणे. कोपरगाव- ९, नेवासे-५, पाथर्डी-७, कर्जत- ५, जामखेड-२, पारनेर-२, संगमनेर-२, अकोले-११, राहुरी-११, श्रीरामपूर-४.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा