गंभीररित्या आजारी बालकांकरिता कॉपरेरेट क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन एका आगळ्यावेगळ्या संगीत कार्यक्रमातून या मुलांकरिता आर्थिक निधी उभारण्यास मदत करणार आहेत.
‘जेनेसिस फाऊंडेशन’च्या वतीने १४ जूनला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्स’चे वाय. एम. देवस्थळी, ‘वेस्टिन’चे अजय चोप्रा, ‘सनलस्ट पिक्चर्स’चे डॅनिअल वेबर, ‘ऱ्हीदम हाऊस’चे मेहमूद करमली, ‘बॉयडेन ग्लोबल एक्झिक्युटिव्ह सर्च’चे दिनेश मिरचंदानी, ‘केपीएमजी’चे हितेश गजारिआ, ‘फाऊंटनहेड प्रमोशन्स अ‍ॅण्ड इव्हेन्ट्स’चे ब्रायन टेलिस, ‘म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे संजय टंडन आणि ‘स्ट्रॅटेजिक मार्केटिंग ग्रुप’चे शिरीष जोशी हे या मुलांकरिता संगीतातील आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
निवडक १२५ श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमातून उभा राहणारा निधी कर्करोग, थॅलसेमिया, कार्डिआक डिसॉर्डर आदी गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लहान मुलांच्या उपचारांकरिता वापरला जाणार आहे, असे जेनेसिसचे संस्थापक विश्वस्त प्रेमा सागर यांनी सांगितले.

Story img Loader