राज्यात टोल वसुली आणि कंत्राटदारांचे संगनमत यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला. या आंदोलनाने धारही पकडली. काही टोलनाके बंदही झाले. राज्यातला टोलनाक्यांचा हा प्रश्न केंद्रात मात्र शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी उचलून धरला. राज्यातील १७९ टोल वसुलीबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केंद्राकडे  आल्याची    माहिती केंद्रीय राजमार्गमंत्री डॉ. सी. पी. जोशी यांनी दिल्याचे  खासदार खैरे यांनी सांगितले.
भारतीय राजमार्ग प्राधिकरणाला टोलसंबंधी किती तक्रारी प्राप्त झाल्या?, त्या टोल एजन्सीवर काय कारवाई केली?, टोल वसुली करताना धोरणांमध्ये असमानता आणि विसंगती आढळून आली काय, असे प्रश्न खैरे यांनी विचारले होते. या अनुषंगाने उत्तर देताना जोशी यांनी ‘टोलवाटोलवी’त कर्नाटकानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील प्रत्येकी ३ तक्रारी, राजस्थान व उत्तर प्रदेशातील दोन प्रकरणांमधील वसुली नियमांशी विसंगत असल्याची माहिती जोशी यांनी दिली. टोल वसुलीकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे, याकडे खासदार खैरे यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा