महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंतांचा शोध घेण्यासाठी विविध शिक्षण संस्थांमध्ये चढाओढ लागली आहे. प्रत्येक महाविद्यालय आमच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी ‘टॉपर’ असल्याचे दावे- प्रतिदावे करीत आहे. शहरातील आंबेडकर आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालय या दोन नामवंत महाविद्यालयातील ९० टक्क्यांच्यावर असलेली यादी यावर्षी वाढली आहे.
गेल्या सात वषार्ंपासून बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी बंद करण्यात आल्यामुळे कोण कुठल्या शाखेतून पहिला किंवा दुसरा आहे हे कळायला मार्ग नसला तरी निकालाबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांंमध्ये उत्सुकता दिसून आली. शहरातील आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, हिस्लॉप, धरमपेठ, सोमलवार, जी एस कॉमर्स, कमला नेहरू महाविद्यालय, बिंझाणी महिला महविद्यालय आदी महाविद्यालये व शाळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जात होती. प्रत्येकजण महाविद्यालयातील ‘टॉपर’ कोण याचा शोध सुरू असून अनेक महाविद्यालय आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथम असल्याचा दावा करीत होते. यावर्षी राज्यात नऊही विभागीय मंडळातच निकालाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील अनुराग भारद्वाजला ९८ टक्के, आदित्य श्रीखंडे ९६.६२, सुरज पाटीलला ९५.८५, अक्षय प्रभूणेला ९५.६९ तर कौस्तुभ हिपवरेला ९५.५४ टक्के गुण मिळाले आहे. शिवाजीमधून अनुराग भारद्वाजलाला ९८ तर आंबेडकर महाविद्यालयाच्या अवती सावजी आणि ऋंजन भेलेकर यांना ९६.७६ टक्के गुण मिळाल्याचा दावा महाविद्यालयातून करण्यात आला. आंबेडकर महाविद्यालयातील अवंती सावजी आणि ऋंजन भेलेकर यांना ९६.७६ टक्के गुण मिळाले. जयकुमार बालाणीला ९५.५३, अभिजित बडोले ९४.४७ गुण मिळाले आहे. वाणिज्य विभागात नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातील तरण्या शिवमेर या विद्यार्थिनीला ९५.५ गुण मिळाले आहेत. कला शाखेत एलएडी महाविद्यालयाची निधी देशमुख हिला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. या शिवाय जीएस कॉमर्स, एलएडी महाविद्यालय, हिस्लॉप महाविद्यालय, रामदासपेठ, कमला नेहरू महाविद्यालय, सोमलवार रामदासपेठ, धरमपेठ महाविद्यालय आदी महाविद्यालयात ‘टॉपर’ विद्यार्थी जाहीर केले जात आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ९० टक्केच्यावर ९६ विद्यार्थी तर आंबेडकर महाविद्यालयात ५८ विद्यार्थी आहे. वाणिज्य विभागात ८५ टक्क्यांच्यावर ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शिक्षण मंडळाने ऑन लाईन निकाल घोषित केल्यामुळे शहरातील बहुतेक इंटरनेट कॅफेवर आणि ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय आहे अशा ठिकाणी निकाल पाहण्यासाठी विद्याथ्यार्ंची गर्दी दिसून आली. दरवर्षी ज्या विद्यार्थ्यांला जितके जास्त पारितोषिक तो विद्यार्थी प्रथम असे निकष मंडळाने लावले होते. मात्र, ऑनलाईन पद्धतीने निकाल घोषित केल्यामुळे मंडळाने सारांश पुस्तिका आणि पारितोषिकांची यादी घोषित केली नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत प्रथम कोण आणि दुसरा कोण आहे याचा शोध घेण्यासाठी प्रसार माध्यमासह विविध शिक्षण संस्थांमध्ये चढाओढ लागली होती. शिक्षण मंडळात विदर्भातून पहिला कोण आहे, राज्यातून पहिला कोण आहे, पहिल्या क्रमांकाला किती टक्के गुण मिळाले अशी विचारपूस केली जात होती. पण, मंडळाचे अधिकारी त्याबाबत काहीच माहिती देऊ शकत नव्हते. शहरातील शिवाजी महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, धरमपेठ, जी एस महाविद्यालय, सोमलवार रामदासपेठ आदी महाविद्यालयात दुपारी १२ नंतर विद्यार्थी जमू लागले. बहुतेक शाळा महाविद्यालयात इंटरनेटवरून विद्यार्थ्यांंना निकाल सांगत होते.
आमचेच विद्यार्थी ‘टॉपर’; महाविद्यालयांचे दावे-प्रतिदावे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंतांचा शोध घेण्यासाठी विविध शिक्षण संस्थांमध्ये
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-06-2014 at 09:42 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now colleges in result competition