वाहन नोंदणी क्रमांकात आलेल्या चार आकडी क्रमांकाच्या गमतीजमती करत आपल्या गाडय़ांचे क्रमांक चित्रविचित्र पद्धतीने लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. ऑगस्ट महिन्यात अशा तब्बल दीडशेहून अधिक वाहनांवर कारवाई करत प्रादेशिक परिवहन विभागाने यापकी ६२ जणांकडून दंड वसूल केला आहे. अशा चित्रविचित्र नंबर प्लेटवर यापुढेही कारवाई करत राहणार असल्याचे वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.वाहनांची नोंदणी केल्यावर मिळणाऱ्या क्रमांकांची मांडणी थोडय़ा विचित्र पद्धतीने करून त्यातून ‘दादा-काका-मामा-राज-शरद’ असे शब्द तयार करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. विशेष म्हणजे यापकी अनेक जण हे राजकीय पक्षांशी संबंधित असतात. २१५१ हा क्रमांक ‘राज’, २१२४ हा क्रमांक ‘शरद’, ४१४१ हा क्रमांक ‘दादा’ अशा पद्धतीने या वेगवेगळ्या क्रमांकांची रचना बदलली जाते. मात्र परिहवन विभागाच्या नियमावलीप्रमाणे क्रमांकांची अशी विचित्र मांडणी करणे नियमबाह्य़ आहे. तसेच पोलिसांना किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही हे क्रमांक वाचणे कठीण जाते.त्यामुळे अशा नंबर प्लेटच्या गाडय़ांवर कारवाई करण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते. ऑगस्ट महिन्यात वडाळा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही अशीच कारवाई सुरू केली. या कारवाईत महिन्याभरात या विभागाच्या हद्दीतील तब्बल १५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील ६२ जणांनी प्रत्येकी १०० रुपये एवढा दंड भरल्याची माहिती वडाळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बी. आय. आजरी यांनी दिली.या नंबर प्लेटप्रमाणेच नियम डावलून आपल्या गाडीवर अनधिकृतपणे लाल-अंबर किंवा पिवळे दिवे लावणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. सरकारच्या परिपत्रकात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाडय़ांवर लावण्याच्या या दिव्यांबाबत नियमावली स्पष्ट केली आहे. मात्र या नियमांना बगल देऊन काही अधिकारी आपल्या गाडय़ांवर दिवे लावत असल्याचे लक्षात आल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यात ऑगस्ट महिन्यात १९ प्रकरणे आढळली असल्याचेही आजरी यांनी स्पष्ट केले. या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader